कल्पनाशून्य कारभार!!!!!

गेल्या महिनाभर प्राध्यापकांचा संप चालु आहे, आणि तो मिटण्याची चिन्हसुद्धा दिसत नाही!! "हा संप अजून तीव्र करु" हे त्यांचे शब्दं... सरकार आणि प्राध्यापक यांच्या अडेलतट्टु भुमिकेमुळे यात नुकसान होतय ते आम्हा विद्यार्थ्यांच... यांच्या या वागण्यात आमचा मात्र नाहक बळी???

सरकार पण जाणिवपूर्वक या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे. मुळात संप करण्याची वेळच का यावी?? म्हणा हा प्रश्नच निरर्थक आहे... असो पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते...आज महिनाभर आमची कॉलेजेस् बंद आहेत आणि ज्यांच शेवटचं वर्ष आहे ते विद्यार्थि चिंतेत आहेत.....पण त्याचं कोणाला काय आहे?? आपल्या मागण्या मान्यं झाल्या पाहिजेत असाच पवित्रा काहीसा या शिक्षकी-संघटनेने घेतलेला वाटतो आहे......

बरं यांच्या बाकीच्या मागण्या मान्य केल्याही आहेत.. सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ करुन दिलेली आहे...आता राहीला आहे प्रश्न तो म्हणजे नेट-सेट परीक्षा रद्द करण्याचा.... मुख्यं म्हणजे ही परीक्षा रद्दचं का करावी?? शिक्षकांची गुणवत्ता याच परीक्षेवर अवलंबून आहे....जर हिच लोक घाबरायला लागली अश्या स्पर्धा-परीक्षांना तर आमच्यासमोर आदर्श कोणाचा ठेवणार?? आणि चर्चा करुन प्रश्नं अजुन सुटलेला नाही....असा हा सरकारचा आणि प्राध्यापकांचा कल्पनाशून्य कारभारं कधी थांबणार???

5 comments:

Unknown said...

deepti madam.... mast mast !!!!!!

SuNiL Tembye said...

wa :))... kontya tari professor la de tujhya blog chi link.. tyanna pan kalu de :P...

Deepti said...

lolz....sadhya toch vichar challay!!!

Unknown said...

very true...kharach kantal ala ahe ya
sampacha..[:x]..its more than a month now...high time they work things out n start colleges soon....
btw nice blog...keep up d good work..[:)]

iron_maiden said...

Hey gr8 Chutku keep up the good work!!! : )

Post a Comment